माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा   

पुणे : माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करुन धमकावलं आणि गरोदर राहिल्यावर गर्भपात केला. २८ वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे आणि त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
२०२१ मध्ये दोघांची एका व्यायामशाळेमध्ये ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि लग्नाचे अमिष दाखवून त्याने तरुणीवर बलात्कार केला. १७  डिसेंबर २०२२ ला तरुणाने तरुणीशी मोबाईलवर संपर्क साधत मला शेवटचे भेटायचे आहे असे सांगोतले. न भेटल्यास कुटुंबीयांना संपवून टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. नंतर तरुणीने थेट याबद्दल तरुणीने थेट माजी नगरसेविकेला सांगितले. त्यानंतरही तिला पुन्हा धमकावले गेले. आरोपीने पीडितेला भेटून लग्न करतो असे सांगत तिच्यावर बलात्कार करत राहिला. या दरम्यान तरुणी गर्भवती राहिली आहे हे समजल्यावर तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचं तरुणीने तक्रारीत म्हंटले आहे. 

Related Articles